Search…

    Saved articles

    You have not yet added any article to your bookmarks!

    Browse articles
    Select News Languages
    Marathi
    Hindi
    Gujarati
    English

    GDPR Compliance

    We use cookies to ensure you get the best experience on our website. By continuing to use our site, you accept our use of cookies, Privacy Policies, and Terms of Service.

    newshunt
    newshunt

    मुख्यमंत्री फडणवीसांकडून 'ऑपरेशन सिंदूर'ची स्तुती:विरोधकांनाही लगावला टोला, म्हणाले - यावेळी पुरावा मागायला जागा नाही

    2 days ago

    भारतीय सैन्य दलाने मंगळवारी मध्यरात्रीनंतर पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करत पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा बदला घेतला. या एअर स्ट्राईकमध्ये 7 शहरांतील दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेशन सिंदूरची स्तुती केली आहे. भारत सहन करणार नाही, हे भारतीय सैन्याने पुन्हा एकदा दाखवून दिले, असे ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूरचे कौतुक करताना फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. यावेळी पुरावा मागायला जागा नाही, असे ते म्हणाले. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा बळी गेला. यामध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश होता. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट होती. सरकारने या हल्ल्याचा बदला घ्यावा, अशी मागणी नागरिकांकमधून केली जात होती. अखेर पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसांनंतर भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील दशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून बदला घेतला. या कारवाईनंतर देशभरातून समाधान व्यक्त केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कारवाईवर आनंद व्यक्त केला असून भारतीय सैन्यदल आणि पंतप्रधान मोदींचे अभिनंदन व्यक्त केले आहे. नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उध्वस्त केले आहेत. या कारवाईचे संपूर्ण शुटिंग करण्यात आले असल्यामुळे यावेळी कुणाला पुरावा मागण्याकरिता जागाच उरली नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला. मला असे वाटते की, सर्व भारतीयांकरिता अभिमानाचा असा हा दिवस आहे. आमच्यावर झालेला हल्ला भारत सहन करणार नाही. भारत योग्य पद्धतीने बदला घेईल, हे आपण दाखवून दिले आहे. ऑपरेशन सिंदूर हे नाव अधिक बोलके आहे, असे मला वाटते, असेही फडणवीस म्हणाले. ऑपरेशन सिंदूरनंतर पवारांचा मोदींना फोन दरम्यान, ऑपरेशन सिंदूर पार पडल्यानंतर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरक्षमंत्र्यांना फोन करून या कारवाईचे कौतुक केले. याबाबत शरद पवार यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली. ऑपरेशन 'सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांच्याशी संवाद साधला. भारतीय सशस्त्र दलांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांनी केलेल्या कारवाईसाठी त्यांचे अभिनंदनही केले. या कठीण काळात सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही दिली. अशी पोस्ट शरद पवार यांनी केली आहे. ठाकरेंची 'स्लीपर्स सेल' उद्ध्वस्त करण्याची मागणी दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनीही भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम अशा शब्दांत भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईचे कौतुक केले. तसेच पाकिस्तानचे भारतातील स्लीपर्स सेल्स उद्ध्वस्त करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. भारतीय सैन्याने पाकड्यांच्या दहशतवादी स्थळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद आहे. पहलगाममध्ये 26 मायभगिनींचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करून सैन्याने बदला घेतला, असे ठाकरे म्हणाले. पाकिस्तानचे भारतातील 'स्लीपर्स सेल' उद्ध्वस्त करून दहशतवादाचे समूळ उच्चाटन करणे गरजेचे आहे, अशी मागणीही त्यांनी केली. भारतीय सैन्य सर्व प्रकारच्या परिस्थितीशी सामना करण्यास सक्षम आहे. 'ऑपरेशन सिंदूर'ने ते दाखवून दिले. भारतीय सेनेच्या शौर्याला शिवसेनेचा सलाम, असेही ते म्हणाले.
    Click here to Read more
    Prev Article
    छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल:सायरन वाजताच सुरक्षा दल व बचाव पथक आले ॲक्शन मोडमध्ये, मुंबईतही श्वान पथकासह झाले ड्रिल
    Next Article
    ही फक्त पहिली कारवाई आहे:वाघाने फक्त पंजा उगारला आहे, अजून जबडा उघडायचा आहे; ऑपरेशन सिंदूरवर योगेश कदमांची प्रतिक्रिया

    Related Trending Updates:

    Comments (0)

      Leave a Comment